रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस असून युक्रेनमध्ये तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुपरित्या मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ मिशनचे कौतुक केले आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अधिक गतीमान असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच युक्रेनच्या पूर्व भागांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पुढील २४ तासांमध्ये पंधरा विमानांचे उड्डाण होणार असून आतापर्यंत १७ हजार भारतीयांनी युक्रेन सोडले असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.