अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू आणि मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहेत. अशिक्षित असलेले अधिक आदिवासी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत नाही. आता बालमृत्यू आणि मातामृत्यू हे मांत्रिकांच्या मदतीनेच कमी होणार आहे. असा दावा करत आरोग्य विभाग मांत्रिकांची मदत घेत आहे.
मेळघाटातील ६०० च्यावर मांत्रिकांना मंगळवार पासून गोळा करून मांत्रिकांना आरोग्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. त्यांना मानधन म्हणून १०० रुपये देखील देणार आहे. आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा. यासाठी आता मांत्रिकच प्रशासनाला मदत करणार आहे. त्यासाठी प्रशासन मांत्रिकाच्या दारी पोहोचले. त्या मांत्रिकाने रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा; असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तर भूमिकाच्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यू व आरोग्याच्या समस्या निकाली काढण्यात काही प्रमाणात यश मिळेल असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा ही अपयश का आलं. कारण त्यांना मांत्रिकाची मदत घ्यावी लागते हा चिंतेचा विषय आहे. भूमिकाला प्रशिक्षण देणाऱ्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी स्वागत केले. पण इतकी वर्षे होईनही आरोग्य यंत्रणा का अपयशी ठरली? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.