बारावी परिक्षेचा निकाल कसा पाहाल ऑनलाईन?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला.   गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी तीन नंतर […]

बारावी परिक्षेचा निकाल कसा पाहाल ऑनलाईन?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी तीन नंतर संबंधित महाविद्यालयात मिळणार आहे.

 

दरम्यान, यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून, 93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 95.20 टक्क्यांसह कोकण पॅटर्न यशस्वी ठरला आहे. तर 88.21 टक्क्यांसह मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.

विविध विभागात बारावीच्या निकालांची जाहीर झालेली टक्केवारी –

कोकण विभाग – 95.20%
कोल्हापूर विभाग – 91.40%
पुणे विभाग – 91.16%
औरंगाबाद – 89.83%
अमरावती – 89.12%
नागपूर – 89.05%
नाशिक विभाग – 88.22 %
लातूर – 88.22 %
मुंबई विभाग – 88.21%

 

येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http//www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results

मोबाईल शॉर्ट कोड
bsnl – MHHSC – sms to 57766

idea, vodafone, tata, reliance – MAH12 – sms to 58888111

airtel, aircel, idea, vodafone युजर्सनी *588# हा यूएसएसडी कोड डायल करा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number