कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं

नाशिकमधील मनमाड चांदवड मालेगाव उमराणा बाजार समितीत अशा बाजार समितीमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ठरवले जातात. मात्र यंदाच्या वर्षी दोन ते तीन हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता १००० च्या खाली येऊन ठेपले आहे. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव ६०० ते ७०० रुपये […]

कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं

नाशिकमधील मनमाड चांदवड मालेगाव उमराणा बाजार समितीत अशा बाजार समितीमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ठरवले जातात. मात्र यंदाच्या वर्षी दोन ते तीन हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता १००० च्या खाली येऊन ठेपले आहे. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव ६०० ते ७०० रुपये पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च कसा मिळवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगावची ओळख आहे. या ठिकाणीच वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली असल्याने कांद्याने दर पडले आहेत. मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर चांगला दर मिळाल्यास जास्त पैसे मिळतील अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र. लाल कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकीकडे चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे त्याच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. लाल कांद्याचे भाव सरासरी ९०० रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामध्ये किमान बाजारभाव २०० ते जास्तीत जास्त १२०० रुपयांपर्यंत भाव आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number