नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाफेडने ठरवलेला दर बाजार समितीत मिळत नसल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा बंद पडले. जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड,पिंपळगाव याठिकाणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत […]

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाफेडने ठरवलेला दर बाजार समितीत मिळत नसल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा बंद पडले.

जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड,पिंपळगाव याठिकाणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत नाफेडचे अधिकारी बाजार समितीतमध्ये येऊन लिलावात भाग घेत नाही तोपर्यंत लिलाव होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने लिलाव बंद झाले.

याआधी केंद्र सरकारने निर्यातीसाठीच्या कांद्यावर ४० टक्के कर लागू केला. या निर्णयाला विरोध म्हणून व्यापारी संघटनांनी कांद्याचे लिलाव सलग तीन दिवस बंद पाडले होते. केंद्र सरकारने २४१० रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची तयारी दाखवली. यानंतर व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखवली. पण लिलावाच्या वेळी नाफेडचे अधिकारी अनुपस्थित होते आणि व्यापारी संघटनांनी २४१० पेक्षा कमी दर देण्याची तयारी दाखवली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number