एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

  कोरोनाकाळात सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या. तसेच आरोग्य विषयासह अनेक परिक्षांचा घोळ समोर आला. कोरोना काळात एमपीएससीच्या परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देण्यापासून मुकणार होते. मात्र या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससी परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.   येत्या १९ […]

एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

  कोरोनाकाळात सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या. तसेच आरोग्य विषयासह अनेक परिक्षांचा घोळ समोर आला. कोरोना काळात एमपीएससीच्या परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देण्यापासून मुकणार होते. मात्र या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससी परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

  येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय लागू होणार आहे. कोरोना काळामुळे गेली दोन वर्षे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाही. यादरम्यान उमेदवारांचे वय देखील वाढले. त्यामुळे या परिक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. परिक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी लक्षात घेऊन एमपीएससी परिक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे. त्या उमेदवारांसाठी एक वर्ष मदुतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number