Homeताज्या बातम्याAnalog Cheese Ban : FDA ची कारवाई! आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी; आयुक्त मुंढेंकडून राजपत्र जारी
Analog Cheese Ban : FDA ची कारवाई! आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी; आयुक्त मुंढेंकडून राजपत्र जारी
मुंबई : महाराष्ट्रात एनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी यासंबंधीत राजपत्र जारी केले आहे. तसेच आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर कारवाई होणार असल्याचा इशार एफडीएने दिला आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॅटरिंग सेवेत आर्टिफिशियल पनीर वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्रात 70 टक्के […]
मुंबई : महाराष्ट्रात एनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी यासंबंधीत राजपत्र जारी केले आहे. तसेच आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर कारवाई होणार असल्याचा इशार एफडीएने दिला आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॅटरिंग सेवेत आर्टिफिशियल पनीर वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्रात 70 टक्के पनीरचे पदार्थ हे आर्टिफिशियल पनीरपासून तयार होत असून आर्टिफिशियल पनीरचा मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याचे आदेश यापूर्वी एफडीएने दिले होते. आदेशाचे पालन होत नसल्याने एफडीएकडून आता थेट बंदीची कारवाई करण्यात आली आहे.