एकतर्फी प्रेमातून मुलीचे घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोमियोला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, अटक केलेल्या युवकाचे नाव रितेश मेहरोल असे आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि रितेश मेहरोल याला अटक केली.
रितेशवर यापूर्वीचेही काही गुन्हे दाखल आहेत.
रितेशने तिला लग्नाची मागणी केल्यानंतर देखील तिच्या मागे लग्नाची मागणी करत होता.
अखेर तिने नकार दिल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले आहे, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.