अंगावर झाड कोसळून एकजण ठार

पावसाने आता मुंबईसह उपनगरात जोर धरला आहे. पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला असून सुरुवातीलाच जोरदार फटका बसला आहे. उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात पाऊस सुरू आहे. दरम्यान, भायखळ्यात मध्यरात्री झाड कोसळून तीन जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. इंदू ऑईल मिल कंपाउंडमध्ये मध्यरात्री २.३० वाजता ही घटना घडलीये.सध्या जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार […]

अंगावर झाड कोसळून एकजण ठार

पावसाने आता मुंबईसह उपनगरात जोर धरला आहे. पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला असून सुरुवातीलाच जोरदार फटका बसला आहे. उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात पाऊस सुरू आहे. दरम्यान, भायखळ्यात मध्यरात्री झाड कोसळून तीन जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. इंदू ऑईल मिल कंपाउंडमध्ये मध्यरात्री २.३० वाजता ही घटना घडलीये.सध्या जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव रेहमान खान (२२) असं आहे. राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number