मुंबई, ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे ही समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. समाज माध्यमांवर तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अशातच आता अभिज्ञाच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिज्ञाने अलीकडेहक एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. यात ती तिच्या पतीशी संवाद साधताना दिसत आहे. ती वेगवेगळ्या गोष्टी पतीला सांगते. मात्र त्यात त्याचे लक्ष मोबाईलमध्ये असते. अशावेळी अभिज्ञा सतत बोलत राहते. मग एका ठिकाणी येऊन ती थांबते, तिच्या बोलण्यात येणाऱा आईचा उल्लेख तिच्या पतीला खटकतो आणि तो बोलू लागतो. त्याचं हे बोलणं अभिज्ञा बारकाईनं ऐकते.
अभिज्ञा पतीला विचारते की, मी यापूर्वी ज्या गोष्टी बोलले त्याविषयी मला सांग. त्यावर तिच्या पतीला काहीच सांगता येत नाही. तो निरुत्तर होतो. तेव्हा अभिज्ञाला कळून चुकते की, त्याचे लक्ष नव्हते. त्यावरुन ती हसू लागते. अभिज्ञानं यात जी ट्रीक वापरली आहे ती या व्हिडिओची खास गोष्ट आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला ती ट्रीक कळून येईल. या व्हिडिओत अभिज्ञाने लढवलेली शक्कल पाहून नेटकरी त्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करू लागले आहेत.
या पोस्टखाली लिहिलेल्या कॅप्शनमध्ये अभिज्ञा म्हणते की, ही आता माझी रोजची कहाणी झाली आहे. मला वाटते की, आतातरी मी माझ्या पतीचे लक्ष वेधून घेईल. मला माफ कर मेहूल पै…असे अभिज्ञानं म्हटले आहे. अभिज्ञाची ती पोस्ट सध्या वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.