मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर भारतीयाला अटक

गुजराथ असो किंवा महाराष्ट्र, सध्या उत्तर भारतीयांविरोधात वातावरण तापलं आहे. उत्तर भारतीय गुन्हेगारांकडून स्त्रियांचे लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं निदर्शनास येऊ लागलंय. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे घडली आहे. मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आलिगढ़च्या महंमद कुरेशी या चोवीस वर्षीय तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांनी अटक केली आहे. […]

मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर भारतीयाला अटक

गुजराथ असो किंवा महाराष्ट्र, सध्या उत्तर भारतीयांविरोधात वातावरण तापलं आहे. उत्तर भारतीय गुन्हेगारांकडून स्त्रियांचे लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं निदर्शनास येऊ लागलंय. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे घडली आहे. मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आलिगढ़च्या महंमद कुरेशी या चोवीस वर्षीय तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांनी अटक केली आहे.

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील वस्तीत मिक्सर विकण्यासाठी महंमद कुरेशी आला होता. गावातील एका घरात मतिमंद मुलगी एकटीच असल्याचा फायदा त्याने घेतला. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून या मुलीवर बलात्कार केला. यानंतर हा नराधम तेथून पळून गेला.

घडलेली घटना यामुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितली. या घटनेची माहिती फोनवर सर्वत्र देण्यात आली. तेव्हा मिक्सर विकणाऱ्या तरुणाला पकडून पीडित मुलीसमोर आणले. या मुलीने बलात्काऱ्याला ओळखले. त्यानंतर या तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून ते आता पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number