कोल्हापुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

कोल्हापूर शहराच्या जवळपास ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे गळती शोधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका पुढील आठवड्यात उपसा केंद्र पुन्हा बंद करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील आठवड्यात गळती शोधण्यासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. दरम्यान, ई वॉर्डास व संपूर्ण राजारामपुरी १ […]

कोल्हापुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

कोल्हापूर शहराच्या जवळपास ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे गळती शोधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका पुढील आठवड्यात उपसा केंद्र पुन्हा बंद करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील आठवड्यात गळती शोधण्यासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

दरम्यान, ई वॉर्डास व संपूर्ण राजारामपुरी १ ली ते १३ वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत आदी भागात शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.

शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्राकडील पंप दुरूस्त होईपर्यंत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार नाही. एकाचवेळी सर्वांना पाणी द्यायचे झाल्यास उंचावरील भागात पाणीच पोहचत नाही असे आजवर घडत आले. त्यातून वाद, आंदोलने होण्यापेक्षा सर्वांना पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी तीन वॉर्डमध्ये दिवसाआड पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरूवात शनिवारपासून होत असून, यादिवशी केवळ ई वॉर्ड व संलग्न भागात पाणी येईल. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १५) या भागातील पाणी बंद करून ए , बी वॉर्ड, संलग्न उपनगरांना पाणीपुरवठा होईल. याप्रमाणे ३० जानेवारीपर्यंत नियोजन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number