‘आमची सत्ता आल्यावर मोदी, शाहा शिवसेनेत येणार’

मुंबईतील वरळी येथे रविवारी (दि.१८ मे) उबठाचे राज्यव्यापी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात बोलत असताना उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह, मोदी, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन […]

‘आमची सत्ता आल्यावर मोदी, शाहा शिवसेनेत येणार’

मुंबईतील वरळी येथे रविवारी (दि.१८ मे) उबठाचे राज्यव्यापी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात बोलत असताना उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह, मोदी, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन जण देश चालवत आहेत. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबीरात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी चौफेर टीका केली. संजय राऊत यांनी यावेली स्वबळाचा नारा दिला. महाराष्ट्रात भगवा फडकवू असे त्यांनी म्हटले. मुंबईत आमचीच सत्ता येणार. त्याशिवाय महाराष्ट्रातही स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचाय, असेही राऊत म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली, त्याशिवाय मोदी-शाह यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही, आमचे भाडंण महाराष्ट्रद्रोह्याशी आहे, असेही सांगितले. २०२४ ला सुद्धा हा देश आपल्याला ताब्यात घय्याचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number