जागतिक अंडी दिवस! विद्यार्थ्यांसाठी 2 लाख अंडी!

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा ‘जागतिक अंडी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख अंडी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पडघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती उज्वला गणेश गवळी […]

जागतिक अंडी दिवस! विद्यार्थ्यांसाठी 2 लाख अंडी!

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा ‘जागतिक अंडी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख अंडी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पडघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती उज्वला गणेश गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांनी अंड्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्व सांगत विद्यार्थ्यांना ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ या स्लोगनची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी दररोज अंडी खावीत असं प्रतिपादन केलं. अंडी हे पौष्टिक अन्न असून त्यामधून प्रथिने, कॅलरीज मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने आणि उपलब्ध असल्याने ती खाण्याकडे विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण व्हावी, याचसाठी या ‘जागतिक अंडी दिना’निमित्त ठाणे जिल्हा परिषद पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यामधून दोन लाख अंडी वितरीत करण्यात येत आहे.

 

सरासरी १८० अंडी वर्षभरात खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे सांगत त्या बद्दल असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number