Chhatrapati Sambhajinagar : नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय समीकरणं बदलली; शिंदेसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील नगरपंचायत निवडणुकींतर्गत सोमवारी राजकीय उलथापालथ झाली.

Chhatrapati Sambhajinagar : नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय समीकरणं बदलली; शिंदेसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील नगरपंचायत निवडणुकींतर्गत सोमवारी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे सेनेने भाजपवर युतीधर्माचा भंग केल्याची टीका केली आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती आहे. या युतीत सहभागी न होता शिंदे सेनेने ११ नगराध्यक्षपदासह जागांवर उमेदवार उभे केले होते. नगराध्यक्षपदाची उमेदवारी आनंदा ढोके यांना देण्यात आली होती. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपासून शहरात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली.

हेही वाचा : Dhananjay Munde on Walmik Karad: 'माझा सहकारी आज…'; परळीतील प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण

भाजपच्या नेत्यांनी शिंदे सेनेचे उमेदवार ढोके यांनाच भाजपात आणण्याची रणनीती आखली. त्यात त्यांना यश आले. त्यानंतर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आनंदा ढोके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, पक्षांतर्गत काही अडचणी येत असल्याने मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे आणि भाजपत प्रवेश करीत आहे. त्यानंतर काही वेळातच भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट आणि योगेश मिसाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सेनेच्या प्रमुख उमेदवारालाच भाजपात आणल्याने भाजप-राष्ट्रवादी युतीने विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीमुळे फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number