राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सतत सुरु असतात. त्यात राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सातत्याने सुरूच असते. दरम्यान, नाना पटोले यांनी ‘राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री डेप्युटेशनवर’ अशी टीका केली आहे.
सध्या सर्वत्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलले जात आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी दिल्ली गाठली आहे. तर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सरकार आलं तेव्हापासून दिल्ली दरबारी जास्त वेळ घालतात आहे. दिल्ली वाले जसे घोषणांचा पाऊस पडतात तसचं हे राज्यात घोषणांचा पाऊस पडण्याचं काम करतात आहेत. महागाई रोज वाढत आहे. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कायम दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्यासाठी जातात. यांच्याकडून अपेक्षा करण्याचं कारण नाही, अशी टीका नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली वारीवर केली आहे.