देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ७३, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशाला कोरोना विषाणूने घेरले असून आता नव्या ओमायक्रॉन या विषाणूने शिरकाव केला आहे. देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात ओमायक्रॉन विषाणूची रुग्ण संख्या ७३वर पोहचली असून महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दररोज ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची भर पडत असून बुधवारी […]

देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ७३, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशाला कोरोना विषाणूने घेरले असून आता नव्या ओमायक्रॉन या विषाणूने शिरकाव केला आहे. देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात ओमायक्रॉन विषाणूची रुग्ण संख्या ७३वर पोहचली असून महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दररोज ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची भर पडत असून बुधवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ४, केरळमध्ये ४ आणि तामिळनाडूमध्ये एक रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ७३वर पोहचली आहे. ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा व्हेरिएंट हातपाय पसरत आहे.

बुधवारी दक्षिण आफ्रिकेमधून आलेला नागरिक तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉन बाधित आढळला. नायजेरिया येथून चेन्नई येथे परतलेल्या ४७ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली. राज्यातील हा पहिला रुग्ण ठरला. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि केरळमध्येही दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तसेच मुंबईतसुद्धा ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहेत नियम?

कोणतेही दुकान, मॉल, कार्यक्रम याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लीसकरण झालेले हवे. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचेही पूर्ण लसीकरण झालेले असावे. दरम्यान लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कार्यक्रम, समारंभासाठी ५० टक्क्यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पूर्ण लसीकरण तसेच ७२ तासांपूर्वी केलेली आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. नव्या वर्षानिमित्त होणाऱ्या पार्टीवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेची ४ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number