वृत्तसंस्था, इंडोनेशिया
जगातील सर्वात वृद्ध माणूस अशी ओळख असलेल्या इंडोनेशियामधल्या सोदीमेजो यांचे वयाच्या 146 व्या वर्षी निधन झालं. जावामधल्या सेरागेन जिल्ह्यात राहणाऱ्या सोदीमेजो यांचा जन्म 1870 मध्ये झाला.
गेल्याच वर्षी त्यांनी आपला 146 वा वाढदिवस साजरा केला होता. सोदीमेजो आपल्या नातवंडांसोबत राहत होते.
सोदीमेजो जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहेत, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. गेल्या आठवड्याभरापासून ते आजारी होते. तसेच अन्न पाण्याचाही त्यांनी त्याग केला होता. सोमवारी त्यांचे राहात्या घरी निधन झालं.