जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
आजकालचे तरुण थोडसे चालले तरी त्यांना दमायला होतं. मग सायकल चालवणं किंवा गड-किल्ले चढणं तर दूरच राहिलं. पण बुलडाण्यात एक असे आजोबा आहेत ज्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.
पांडुरंग भालेराव चक्क वयाच्या 72 व्या वर्षी अमरनाथला निघालेयंत, आणि तेही चक्क सायकलवरुन अमरनाथच्या सायकस स्वारीचं हे त्यांचं चौथं वर्ष आहे. यंदा त्यांच्यासोबत 17 जणांचा चमू आहे. आजोबांच्या या स्वारीला त्यांचे गावकरी आणि कुटुंबियही साथ देत आहेत.