जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सोमवारी मध्यरात्रीपासून ओला उबेर चालक मालक संघटना संपावर गेली आहे. अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी चालकांनी हा संप पुकारला आहे. संप तीव्र करण्याच्या उद्देशाने अनेक चालक राष्ट्रीय मिल मजदूर संघात सहभागी होण्याची चिन्हे आहेत.
सध्या मुंबईमध्ये 30 हजारावर कॅब आहेत. मात्र, या संपामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.
चालकाचा जीवन विमा आणि एक समान भत्ता मिळण्याची मागणी ओला उबेर संघटनांनी केली आहे.