जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरामदायी आणि किफायतशीर सेवा पुरवणाऱ्या ओलाच्या टॅक्सीमध्ये तुम्ही प्रवास केला असेलच. आता ह्याच टॅक्सीचा आनंद बसमध्ये घेता आता तर? हो, लवकरच मुंबईच्या रस्त्यावर ओलाची बस धावताना दिसणार आहे. या सेवेसाठी प्रवाशांकडून प्रतिकिमी 4 रुपये दर आकारला जाणार आहे.
सुरुवातीच्या काळात भाईंदर- पनवेल ठाणे, बीकेसी, अंधेरी अशा ठराविक मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. पण सेवा कधी सुरु होणार याची निश्चित तारिख अद्याप जाहीर झालेली नाही. या सेवेमुळे प्रवाशांची सोय होईल. मात्र अधिच तोट्यात असणाऱ्या सरकारी बस यंत्रणांचं यामुळे कंबरडं मोडणार आहे.