ओला, उबेर चालकांचा संप स्थगित

मुंबईतील ओला आणि उबेर टॅक्सी चालकांचा संप स्थगित करण्यात आला आहे. बारा दिवसांनंतर ओला आणि उबेर चालकांच्या संघटनांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.   प्रत्येक ट्रिपमागे ओला आणि उबेर ड्रायव्हर्सना अधिक पैसे मिळावेत यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत इन्सेंटिव योजना लागू करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. 15 तारखेनंतर पुन्हा एकदा […]

ओला, उबेर चालकांचा संप स्थगित

मुंबईतील ओला आणि उबेर टॅक्सी चालकांचा संप स्थगित करण्यात आला आहे. बारा दिवसांनंतर ओला आणि उबेर चालकांच्या संघटनांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

 

प्रत्येक ट्रिपमागे ओला आणि उबेर ड्रायव्हर्सना अधिक पैसे मिळावेत यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत इन्सेंटिव योजना लागू करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. 15 तारखेनंतर पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.

 

दिवाळी दरम्यान ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे.

 

 

काय होत्या टॅक्सी चालकांच्या मागण्या?

टॅक्सीचं कमीत कमी भाडं 100 ते 150 रुपयांमध्ये असावं

प्रति किलोमीटरमागे 18 ते 23 रुपये भाडं असावं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number