जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ओखी वादळाचा तडाखा आता महाराष्ट्रालाही बसू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्विपमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओखी वादळ हे थेट मुंबई आणि कोकणाच्या दिशेने सरकत आहे.
6 डिसेंबरपर्यंत सावधानता बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलीये. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई किनारपट्टीतही सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय.
मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागलाय. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावलीये. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळतोय.
मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झालीये. कालपासून सुरु असलेल्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाहीये. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये.