मुंबईत आजारांनी डोकं काढलं वर, हे करा घरगुती उपाय

ऑक्टोबर हीटने पहिल्याच आठवड्य़ात राज्यभरातील नागरिकांना हैराण केले आहे. प्रचंड जाणवणाऱ्या उकाड्यामुळे संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अंगावर पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडून त्यावर पांढरे डाग दिसण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. बराच वेळ घामट कपड्यांमध्ये राहिल्यामुळे नायटा, गजकर्ण यासारख्या त्वचाविकारांमध्येही वाढ झाल्याचं त्वचाविकारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. […]

मुंबईत आजारांनी डोकं काढलं वर, हे करा घरगुती उपाय

ऑक्टोबर हीटने पहिल्याच आठवड्य़ात राज्यभरातील नागरिकांना हैराण केले आहे. प्रचंड जाणवणाऱ्या उकाड्यामुळे संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

अंगावर पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडून त्यावर पांढरे डाग दिसण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

बराच वेळ घामट कपड्यांमध्ये राहिल्यामुळे नायटा, गजकर्ण यासारख्या त्वचाविकारांमध्येही वाढ झाल्याचं त्वचाविकारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

  • ऑक्टोबर हिटमुळे आजारांमध्ये वाढ
  •  त्वचाविकारांच्या तक्रारी वाढल्या

6आॅक्टोबर म्हणजेच काल शनिवारी अधिकतम कमाल  तापमान 37.2 अंश सेल्सिअस इतके नोंदव‌ण्यिात आले. ऑक्टोबर हीट नेहमीच मुंबईकरांना हैराण करून सोडते. 

ऑक्टोबर महिन्यात यावर्षीही सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तिसऱ्यांदा सर्वात मोठ्या तापमानाची नोंद आहे.

सामान्यतः या त्रासावर घरगुती उपाय

  • कडूलिंबाचा रस प्या.
  • दूधात गुलकंद घालून प्या.
  • समुद्राच्या पाण्याने अंघोळ केल्याने एक्जिमाच्या रुग्णाला फायदा होतो.
  • कडूलिंबाची पाने पाण्यात घालून उकळवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा.
  • डाळिंबाच्या पानांची पेस्ट लावा.
  • हळदीचा लेप लावणेही फायदेशीर ठरेल.
  • ओवा पाण्यात उकळवा आणि त्या पाण्याने ती जागा धुवा.
  • केळ्याच्या गरात लिंबाचा रस घालून ते मिश्रण खाज येणाऱ्या जागी लावा.
  • किसलेल्या गाजरात सेंधव मीठ घाला आणि ते कोमट करून त्या जागी लावा.
  • कच्च्या बटाट्याचा रस लावा.
  • सिंगाडात लिंबाचा रस घालून लावा.
  • कडूलिंबाची पाने वाटून त्यात दही घालून ती पेस्ट खाज येणाऱ्या जागी लावा.
  • झेंडूची पाने पाण्यात उकळवून त्याची पेस्ट लावणे देखील उपयुक्त ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number