न्यूझीलंडशी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने टीमइंडियाविरुद्धच पहिल्या टी-20 सामन्यात कॅप्टन विराट कोहलीने नाऩेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 203 धावा केल्या.
रोहित लवकर तंबूत परतल्यावर के एल राहुलने आपल्या खास शैलीत धावा केल्या. मात्र दमदार खेळी करत विजयाचा शिल्पकार ठरला तो श्रेयस अय्यर.
त्याच्या धमाकेदार खेळीमुळे T-20 सामन्यात भारताने 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
भारताने आपल्या समोरील 203 धावांचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. 5 विकेट्स गमावून आणि 1 ओव्हर राखून टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.