‘निपा’ या भयानक विषाणूपासून सावधान…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सध्या देशात ‘निपा’ या भयानक विषाणूनं थैमान घातलं आहे. केरळमध्ये या विषाणुने 6 जणांचा बळी घेतला आहे. मुख्य चिंतेची बाब म्हणजे या आजारावर कोणताही उपचार नाही. निपाह हा संसर्गजन्य रोग असून तो मोठ्या प्रमाणात त्याची लागण होते. केरळमध्ये ‘निपा व्हायरस’चा धोका वाढत असून, या मृत्यूमुळे कोझिकोडमध्ये आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती […]

‘निपा’ या भयानक विषाणूपासून सावधान…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या देशात ‘निपा’ या भयानक विषाणूनं थैमान घातलं आहे. केरळमध्ये या विषाणुने 6 जणांचा बळी घेतला आहे. मुख्य चिंतेची बाब म्हणजे या आजारावर कोणताही उपचार नाही.

निपाह हा संसर्गजन्य रोग असून तो मोठ्या प्रमाणात त्याची लागण होते. केरळमध्ये ‘निपा व्हायरस’चा धोका वाढत असून, या मृत्यूमुळे कोझिकोडमध्ये आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ लोकांचा समावेश आहे. तसेच, या १६ लोकांमध्ये एका नर्सचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या धोक्यावर तोडगा काढण्यासाठी केरळ सरकारने एका उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

काय आहे ‘निपा व्हायरस’ ?

  •  गंभीर संसर्गजन्य विषाणू
  •  वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राण्यामध्ये आणि प्राण्यामधून माणसांमध्ये व्हायरल
  •  1988  मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपामध्ये सुरुवात
  •  निपा शहराच्या नावावरुन ‘निपा व्हायरस’
  •  2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रसार 

निपा विषाणूची लक्षणं –

  • रुग्णांना श्वास घेण्यास त्रास
  • मेंदूमध्ये जळजळ
  • मेंदूला सूज येणं
  • ताप, डोकेदुखी, चक्कर
  • योग्य वेळेत निदान किंवा उपचार न झाल्यास कोमात जाण्याची शक्यता

काय काळजी घ्याल?

  • विशेषतः खजूर खाणं टाळावं
  • जमिनीवर पडलेलं फळ खाणं टाळावं
  • आजारी प्राण्यांपासून दूर रहावं

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number