मुंबईतील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ऑगस्टमध्ये पहिल्या वीस दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या १०० रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू, लेप्टोचाही धोका वाढत आहे. एच १ एन१ रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढही चिंताजनक असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. मुंबईकरांमध्ये घसादुखी, सर्दी, खोकला आणि तीव्र स्वरूपाचा ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. व्हायरल, डेंग्यू किंवा मलेरिया यापैकी कोणत्याही […]

मुंबईतील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ऑगस्टमध्ये पहिल्या वीस दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या १०० रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू, लेप्टोचाही धोका वाढत आहे. एच १ एन१ रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढही चिंताजनक असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मुंबईकरांमध्ये घसादुखी, सर्दी, खोकला आणि तीव्र स्वरूपाचा ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. व्हायरल, डेंग्यू किंवा मलेरिया यापैकी कोणत्याही आजाराचे निदान न झाल्यास स्वाइन फ्लूच्या आजारासाठीही निदान चाचण्या करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना काळात स्वाइन फ्लूचा संसर्ग कमी होता. मात्र, आता हा संसर्ग वाढताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number