राज्यात मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाका, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान केले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
कामावर रुजू न झालेल्या एसटीच्या ५५ हजार संपकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी आता त्यांच्या जागी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
बडतर्फ आणि निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर लवकरच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या चालकांना काम करण्याची संधी मिळणार आहे. २० हजार मासिक वेतनावर करार पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होईल हे कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावे, असे अजित पवार म्हणाले. राज्य सरकराने कर्मचाऱ्यांचे वतेनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तरिही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.