मुंबई विद्यापीठाच्या ‘या’ निर्णयाला युवासेनेचा विरोध

मुंबई विद्यापीठाने गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाइन मूल्यांकन पद्धत सुरू केली आहे, पण त्यामधील त्रुटींमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक असताना विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष करत मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांवर संबंधित विद्यार्थ्याचे नाव लिहिण्यासाठी चालू वर्षापासून रकाना ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिका कोणाच्या आहेत हे समजणार असल्याने त्यामध्ये फेरफार […]

मुंबई विद्यापीठाच्या ‘या’ निर्णयाला युवासेनेचा विरोध

मुंबई विद्यापीठाने गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाइन मूल्यांकन पद्धत सुरू केली आहे, पण त्यामधील त्रुटींमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक असताना विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष करत मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांवर संबंधित विद्यार्थ्याचे नाव लिहिण्यासाठी चालू वर्षापासून रकाना ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिका कोणाच्या आहेत हे समजणार असल्याने त्यामध्ये फेरफार होऊ शकतो.

याची गंभीर दखल घेत युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी आज परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करत विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध केला.

परीक्षा केंद्रापासून ते उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपर्यंत सदर उत्तरपत्रिकेत छेडछाड होऊ शकते हे निदर्शनास आणून दिले.

युवासेनेच्या सिनेट सदस्यांची ही मागणी मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला.

यावेळी शिष्टमंडळात व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number