आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही लस मिळणार!

देशात कोरोनाची तिसरी लाट काही प्रमाणात ओसरली असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. अशातच, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांना आता कोरोना लस उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने १२ ते १४ […]

आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही लस मिळणार!

देशात कोरोनाची तिसरी लाट काही प्रमाणात ओसरली असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. अशातच, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांना आता कोरोना लस उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने १२ ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शाळकरी विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

देशातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिम सुरू केली. त्यानुसार संपूर्ण देशभरात टप्प्या टप्प्याने नागरिकांना कोरोना लसीचे दोन मात्रा देण्यात येत आहेत. त्यानंतर आता १५ वर्षांखालील १२ ते १४ वयोगटातील शाळकरी मुलांना कोरोना लस घेता येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number