मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नाहीत. परिणामी त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी,’ असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली.
विधानसभेत शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. बहुमत चाचणीत शिंदे सरकारने बाजी मारली आहे. या बहुमत चाचणीला काही काँग्रेस चे आमदार गैरहजर होते , तर आता या बहुमत चाचणीला गैरहजर असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.तर नाना पटोले सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या ११ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात पुढील निर्णय काय असेल या साठी नाना पाटोले सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
बहुमत चाचणीसाठी अनुपस्थित आमदार :
अशोक चव्हाण
प्रणिती शिंदे
जितेश अंतापूरकर
विजय वडेट्टीवार
झिशान बाबा सिद्दीकी
धीरज विलासराव देशमुख
कुणाल पाटील
राजू आवळे
मोहन हंबर्डे
शिरीष चौधरी
माधवराव जवळगावकर
INC | काँग्रेसच्या ११ आमदारांना नोटीस | Marathi News