‘त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही’

त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या दाराजवळ जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात […]

‘त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही’

त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या दाराजवळ जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट रचण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे वातावरण उद्धवस्त करायचे, नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या असे राज्यात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत असून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले, मागील ६० वर्षात राज्यात रामनवमीला कधीही दंगल झाली नाही. यावर्षी पहिल्यांदाच रामनवमीला दंगल झाली. त्यामुळे रामनवमी दंगली प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी का नेमली नाही, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number