वृत्तसंस्था, नवीदिल्ली
ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
अवघ्या काही तासात या तीनही राज्यांमध्ये कुणाची सरशी होईल हे दिसून येईल. ईशान्येकडील राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आपली ताकत पणाला लावली आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या मेघालय आणि त्रिपुरामध्ये भाजप सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचेल का, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
मेघालय विधानसभेत एकूण 60 जागांसाठी निवडणुक होणार आहे. मेघालयमध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचं सरकार सत्तेत आहे. काँग्रेसचे मुकुल संगमा दहा वर्षांपासून मेघालयमध्ये मुख्यमंत्री पद भूशवत आहेत. विधानसभेच्या या लढाईत प्रमुख लढतही भाजप विरुद्ध काँग्रेसची असणार आहे. 2013 मध्ये भाजपला खातंही उघडता आलं नाही. जर का काँग्रेसचा यात पराभव झाल्यास दिल्लीपासून पूर्वेपर्यंत केवळ मिझोरामच काँग्रेसकडे राहील. भाजपने विजय मिळवल्यास आणखी एक राज्य त्यांच्याकडे जाईल.
त्रिपुरा विधानसभेत एकूण 60 जागांसाठी निवडणुक होणार आहे. त्रिपुरामध्ये अडीच दशकापासून सीपीएफ चे सरकार आहे. 20 वर्षांपासून माणिक सरकार मुख्यमंत्री. त्रिपुरात विधानसभेत प्रमुख लढत ही सीपीएफ विरुद्ध भाजपची आहे. 2013 च्या निवढणुकीत भाजपला खातंही उघडता आलं नव्हत.
सीपीएमचा पराभव झाल्यास अडीच दशकं राखलेला त्रिपुरा त्यांना गमवावा लागेल आणि ही लढत भाजपने जिंकल्यास ईशान्य भारतात भाजपचा आणखी एक विजय होईस. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा प्रभाव दिसून येईल.
नागालँड विधानसभेत एकूण 60 जागांसाठी निवडणुक होणार आहे. नागालँडमध्ये 15 वर्षांपासून एनपीएफ युतीचं सरकार आहे. त्याच्या या सत्तेत भाजपही सहभागी होता. नागालँड विधानसभेत प्रमुख लढत ही एनपीएफ विरुद्ध भाजप अशी असणार आहे. भाजपने युती तोडून एनडीपीपी सोबत हातमिळवणी केली. 2014 पासून एनपीएफ चे के टी आर जेलियांग मुख्यमंत्री आहेत.