Maharashtra Monsoon Update : पावसाचा हाहाकार! कुठे काय परिस्थिती? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आताची स्थिती, पुढील काही तास धोक्याचे

मुंबई : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणेसह विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. काही ठिकणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी दरड कोसळ्याच्याही घटना पाहायला मिळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आज शाळांना तसेच महाविद्यालयांच्या सुट्टी […]

Maharashtra Monsoon Update : पावसाचा हाहाकार! कुठे काय परिस्थिती? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आताची स्थिती, पुढील काही तास धोक्याचे

मुंबई : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणेसह विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. काही ठिकणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी दरड कोसळ्याच्याही घटना पाहायला मिळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आज शाळांना तसेच महाविद्यालयांच्या सुट्टी जाहीर केली असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती. 

हेही वाचा : Mumbai Rain Update: मोठी बातमी! मुंबईवर अस्मानी संकट, तडकाफडकी जाहीर केल्या सुट्ट्या; लोकल रेल्वे सेवाही विस्कळीत

मुंबईत रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले – 

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून, आज शनिवारी दुपारी समुद्राला तब्बल 4.26 मीटर उंच भरती आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता अर्थात कोस्टल रोडच्या दक्षिण भागाची पाहणी केली. यावेळी वरळी समुद्रकिनारी प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून किनाऱ्यावर व कठड्यांवर बसलेल्या नागरिकांना त्यांनी तातडीने तेथून निघून जाण्याचे आवाहन केले. मुसळधार पाऊस आणि उंच भरतीच्या काळात जीव धोक्यात घालून समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच महापालिका आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी यावेळी केले.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, विलेपार्ले पूर्व परिसरालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. नेहरू रोडवरील भोगले चौक आणि पोस्ट ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम उपनगरात कुठे कुठे पाणी सचलंय?

वांद्रे – एसव्ही रोड 

विलेपार्ले – एसव्ही रोड – LIC समोर 

अंधेरी – एसव्ही रोड – महिंद्रा शोरूम जवळ 

अंधेरी – एसव्ही रोड – स्टेशन परिसर 

अंधेरी – सबवे परिसर 

अंधेरी – वीरा देसाई रोड

डोंबिवली एमआयडीसीत काही कंपन्यांमध्ये शिरले पाणी –

डोंबिवली एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक पट्ट्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले असून औद्योगिक पट्ट्यात काही कंपन्यात पाणी घुसल्याने उत्पादनावर परिणाम होऊन काहीशे त्यांना नुकसान सोसावे लागले आहे. फेज दोनमधील मालवण किनारा हॉटेल ते मेट्रोपॉलिटन एक्झोकेम कंपनी पर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. निवासी भागातील वंदेमातरम् उद्यान, सर्व्हिस रोड, एम्स हॉस्पीटल रस्ता, चार बिल्डिंग परिसर इत्यादी ठिकाणी पाणी भरल्याचे दिसत आहे. याला मुख्य कारण केडीएमसीकडून व्यवस्थित नाले सफाई झाले नाही आहेत. नवीन बनविलेले काँक्रिट रस्ते हे उंच झाल्याने काही निवासी इमारतींच्या आवारात पाणी भरल्याचे दिसत आहे. नवीन गटारे/नाले यांची कामे काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. विको नाक्याजवळील जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स ते नंदी पॅलेस हॉटेल पर्यंतच्या नवीन नाल्याचे बांधकाम नुकतेच काही दिवसांपूर्वी सुरू केल्याने त्यातील खड्ड्यात पावसाळी पाणी भरून गेले आहे त्यामुळे आजूबाजूला चिखल झाला आहे. कावेरी चौकजवळील नाल्याचे नवीन बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. नाले सफाईचे काम केडीएमसीकडे आहे तर नवीन नाले, गटारी बांधण्याचे काम एमआयडीसी आहे. दोन्ही यंत्रणा एकमेकाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे. प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रधिनिधींचा यावर वचक नसल्याने सर्व सावळागोंधळ निर्माण झाला आहे.

तसेच रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पाली नागोठणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आंबा नदीने धोका पातळी ओलांडली असून आंबा नदीवरील भेरव – खुरावले फाटा येथील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पुलापलीकडील महागाव, वाघोशी,  भेरव, ताडगाव आदी गावांचा पालीशी संपर्क तुटला आहे. तर आज सकाळपासून उरण शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून चिरनेर, नागाव तसेच तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत पडतो. यावेळी पुरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम हे प्रत्येक गावातील रहिवासी करत होते. तरी शासनाने पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन,यापुढे रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

कोल्हापूरातील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद – 

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. चंदगड आणि गडहिंग्लज या दोन्ही तालुक्यांना जोडणारा भडगाव–गडहिंग्लजदरम्यान हिरण्यकेशी नदीवर तात्पुरता उभारण्यात आलेला पूल नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांनी गडहिंग्लजकडे जाण्यासाठी आजरा मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे दोन्ही तालुक्यांतील संपर्कावर परिणाम झाला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा : Dive Ghat Closed: पुणे-सासवड मार्गावरून प्रवास करताय? आज ‘या’ वेळेत दिवे घाटात नो-एन्ट्री; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सलग चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे पुजारीटोला धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. यामुळे धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्रात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number