मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. सध्या मुंबईच्या सात तलावात मिळून अडीच लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे . पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात […]

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. सध्या मुंबईच्या सात तलावात मिळून अडीच लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे . पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरले होते. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय सायन, माटुंग्यातही काही प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमातामध्ये मात्र अजिबात पाणी साचले नाही. केवळ दोन ते तीन दिवसांच्या पावसात वसई विरार आणि नालासोपारा शहरांना नद्यांचं स्वरूप आले आहे. तर नालासोपारा मधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुसळधार पाऊसामुळे सखल भागात गुढग्याच्या वर पाणी साचले आहे . यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर देखील झाला आहे. या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. फक्त दोन दिवसाच्या पावसात वसई विरार शहर पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number