राऊत आणखी अडचणीत

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात शिवडी न्यायालयाने सुनावणी घेतली आणि राऊतांविरोधात वॉरंट जारी केलं. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. […]

राऊत आणखी अडचणीत

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात शिवडी न्यायालयाने सुनावणी घेतली आणि राऊतांविरोधात वॉरंट जारी केलं. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.

मेधा सोमय्या यांच्यावतीने वकील लक्ष्मण कनल यांनी बाजू मांडली. लक्ष्मण कनल म्हणाले, “आज कोर्टात मेधा सोमय्या यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. संजय राऊत हे पूर्वी देखील या खटल्यामध्ये उपस्थित नव्हते हे आम्ही माननीय कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं आहे. त्यामुळे कोर्टाने आज संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेवेळी हजर राहावं लागणार आहे. जर हजर नाही राहिले तर कोर्ट आपले अधिकार वापरेल”

संजय राऊत यांनी मेधा यांच्यावर १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. याचप्रकरणात मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. जोपर्यंत वॉरंट जारी करत नाही तोपर्यंत राऊत येणार नाहीत, असा युक्तिवाद सोमय्यांच्या वकिलांनी केला. मात्र पुढील तारखेला राऊत हजर राहतील, असं राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाला आश्वासन दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number