जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम
एच एमडी ग्लोबलने आज नोकिया 3310 मोबाईलचं नवं वैरियंट लॉन्च केलेलं आहे. याआधी नोकिया 3310 चं 2G सपोर्ट असलेलं अजुन एक व्हर्जन लॉन्च झालं होतं.
आता नोकिया 3310 मोबाईलचं 3G वैरियंट लॉन्च झालेलं आहे. हा नोकिया 3310 3जी फोन ऑस्ट्रेलियात लॉन्च केला गेला आहे. लवकरच नोकियाचा हा नवा फोन इतर देशांतील बाजारातही दाखल होईल.
येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात या फोनची विक्री सुरू होईल. या फोनची किंमत 89.95 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ 4,600 रुपये इतकी असेल.
या फोनमध्ये 1,200 एमएएचची बॅटरी दिलेली असुन त्यासोबत 27 दिवसांचा बॅटरी बॅकपही दिलेला आहे. ज्यामुळे 6 ते 7 तास फोनवर बोलल्यावरही बॅटरी लवकर उतरत नाही.
याशिवाय आपण तब्बल 40 तास म्युझिकही ऐकु शकतो. एवढंच नाही तर साधारण 35 तास रेडियोही प्ले करु शकतो. असं आश्वासन नोकियाने दिलेलं आहे.
या फोनची आणखी एक खासियत अशी कि, यात चार कलर वैरियंट ऑपशन्स दिलेले आहेत.