‘कुणालाही डिवचण्यात रस नाही’

मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती. याच खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असताना तो ब्रिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला […]

‘कुणालाही डिवचण्यात रस नाही’

मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती. याच खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असताना तो ब्रिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता. जी मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. याच कारखान्यातील ९८ टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. मी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना पुन्हा डिवचण्यात कोणताही रस नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. किरीट सोमय्या हे कोल्हापूरला येणार आहेत. यावेळी ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. याबाबतही मुश्रीफांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात यावे. अंबाबाईचे दर्शन घ्यावं. तसेच त्यांनी माझ्या कामाची माहिती घ्यावी असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले. सोमय्या आल्यानंतर तिकडे कोणीही जाऊ नये असे आवाहन देखील सोमय्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं.

चौकशीच्या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांचा कोणताही दोष नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरुन ते इथे आले आहेत असे हसन मुश्रीफ म्हणाले. अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले हे तेच सांगू शकतील असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले. मी ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही मुश्रीफांनी यावेळी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number