जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारावर जाहीर झाले आहेत. भौतिकशास्त्रासाठी देण्यात येणारा नोबेल यंदा 3 जणांना देण्यात येणार आहे. ऑर्थर आश्कीन, गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड या तिघांना हा विभागून देण्यात आला आहे.
डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. सोमवारी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर आज भौतिकशास्त्रासाठीचे नाव जाहीर करण्यात आले.
आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.