जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा
एकीकडे सत्तेत असेलं भाजप सरकार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतं. तर दुसरीकडे भाजपचेचं पदाधिकारी या योजनांकडे दुर्लक्ष करतायेत असं चित्र समोर आलं.
भंडारा जिल्ह्यात कोका ग्रामपंचायतीत भाजपकडून सरपंच आणि उपसरपंच पदावर निवडून आलेल्या नरवीर टेकाम आणि शिवशंकर सहारे या दोघांनी शौचालय असल्याचं प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पदमुक्त करण्याचा निर्णय दिला.
महत्वाचं म्हणजे गावकऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत करत फटाके उडवत दिवाळी साजरी केली. दरम्यान, या दोघांनी गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.