रुग्णाला झोळीमध्ये टाकून उपचारांसाठी न्यावं लागतंय…

महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याची जाहिरातबाजी कितीही मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी दुर्गम भागांतील आदिवासी जनता मात्र या विकासापासून अजूनही खूप दूर आहे. मुलभूत सुविधाही अद्याप या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. प्रकृती गंभीर असणाऱ्या एका वृद्ध रुग्णाला झोळी करून रुग्णालयात वाहून न्यावं लागल्याची घटना घडली आहे.   सातपुडा डोंगरात अतिदुर्गम भागात वसलेल्या चाळीसटापरी (बुलडाणा जिल्हा, ता. जळगाव […]

रुग्णाला झोळीमध्ये टाकून उपचारांसाठी न्यावं लागतंय…

महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याची जाहिरातबाजी कितीही मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी दुर्गम भागांतील आदिवासी जनता मात्र या विकासापासून अजूनही खूप दूर आहे. मुलभूत सुविधाही अद्याप या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. प्रकृती गंभीर असणाऱ्या एका वृद्ध रुग्णाला झोळी करून रुग्णालयात वाहून न्यावं लागल्याची घटना घडली आहे.

 

सातपुडा डोंगरात अतिदुर्गम भागात वसलेल्या चाळीसटापरी (बुलडाणा जिल्हा, ता. जळगाव जा. ) या आदिवासी गावातून 7 सप्टेंबर 2018 रोजी एका वयोवृद्ध आदिवासी इसमाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. त्यावेळी गावातील तरुण आदिवसींना या वृद्ध व्यक्तीस झोळी करून खांदयावरून वाहून न्यावं लागलं.या गावापर्यंत पक्का रस्ताच नसल्याने अशा प्रकारे रुग्णाला वाहून न्यावं लागत आहे. पायवाटेनं जवळच्या ३ किमी भिंगारा या गावात नेऊन तिथून 10 किमी कच्च्या रस्त्याने दुचाकी किंवा बैलगाडीने बुऱ्हाणपूर जळगाव या पक्क्या रोडपर्यंत पोहचावं लागतं. त्यानंतर चारचाकी किंवा दुसऱ्या कोणत्याही वाहनाने जळगाव येथे जाता येते.

 

वनक्षेत्रात असल्याने या गावासाठी शासनाला रस्ता बांधता येत नाही. दुसरीकडे गावाचं पुनर्वसनही अद्याप झालेलं नाही. त्यामुळे अशा कात्रीत सापडलेल्या चाळीस टापरी या गावाच्या प्रगतीचा मार्गच अडला आहे. आणिबाणीच्या वेळी पायवाटेने अंतर तुडवत आदिवासींना जावं लागत आहे. पायवाटेने दुचाकी नेता येते, पण पावसाळ्यात तर पायी जाणंही मुश्कील असतं. अशा अनेक संकटांशी चाळीस टापरी येथील आदिवासी अनेक वर्षांपासून झुंजत आहे. मात्र ते कधीही सरकारला दोष देत नाहीत. परिस्थितीवर मात करत येथील आदिवासी लोक आपलं जीवन जगत आहेत.

 

स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील दुर्गम भागांचं हे भीषण वास्तव आहे. अजूनही अनेक गावं या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी हे प्रत्येक गावापर्यंत पोहचलेले नाहीत. प्रश्न हा आहे की व्यवस्थेत असे दोष किती दिवस राहणार? एकीकडे आपला देश विकासाच्या नवनवीन पायऱ्या चढत असताना दुसरीकडे अजून साध्या मूलभूत सुविधाही आदिवासींना मिळू नयेत, हे खेदजनक आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणं आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number