दोन डोस घेतल्याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश नाही

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. कोरोनासह राज्यात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश मिळणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग रोखण्यासठी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने […]

दोन डोस घेतल्याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश नाही

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. कोरोनासह राज्यात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्ग रोखण्यासठी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या प्रवेशाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. ज्या भाविकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. येत्या ८ जानेवारीपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशाबाबत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच १० वर्षाच्या आतील आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मंदिरात परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंतेत आता भर पडली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज तातडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकिमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number