कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही – दिलीप वळसे-पाटील

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार भरत गोगावले यांची सहकारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. त्यामुळे मविआच्या निर्णयाविरोधात बंडखोर आमदारांनी दाद मागितली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले होते. दरम्यान, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कोणत्याही […]

कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही – दिलीप वळसे-पाटील

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार भरत गोगावले यांची सहकारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. त्यामुळे मविआच्या निर्णयाविरोधात बंडखोर आमदारांनी दाद मागितली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले होते. दरम्यान, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

गृहमंत्राल, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत अकाऊंटवर ट्विट केले की, राज्यातील कोणत्याही आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, अस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number