प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक नाही, पण…

रविवारी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास वाचावा यासाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून रविवारी पहाटेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. नेहमीच्या वेळेत कोणताही मेगाब्लॉक नसेल. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवार, सकाळी ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार […]

प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक नाही, पण…

रविवारी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास वाचावा यासाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून रविवारी पहाटेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. नेहमीच्या वेळेत कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवार, सकाळी ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस माटुंगा ते मुलुंडमध्ये धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

रद्द होणाऱ्या फेऱ्या

– विद्याविहारमधून सुटणारी स. ५.३९ वाजताची कुर्ला-कल्याण लोकल

– दादरहून सुटणारी स. ६.४८ची कल्याण लोकल

– दादरहून सुटणारी स. ८.०७ची कल्याण लेाकल विद्याविहारहून स. ८.२१ वा. सुटेल.

हार्बरवर ब्लॉक

हार्बर मार्गावर, सीएसएमटी-कुर्ला/माहीमपर्यंत दोन्ही मार्गांवर आज मध्यरात्रीनंतर १.२० ते सकाळी ६.२० पर्यंत मेगाब्लॉक असेल.

सीएसएमटी-वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी मार्गावर पहाटे ४.३२ ते स. ६.४६पर्यंत आणि पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ४.०३ ते स. ५.५९ पर्यंत सेवा खंडीत करण्यात येणार आहे.

सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरीपर्यंत पहाटे ४.२६ ते स. ६.२१ आणि वांद्रे-अंधेरी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ५.१३ ते स. ६.१६पर्यंत सेवा खंडीत राहतील. या मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

‘परे’वर गाड्या जलद मार्गावर

पश्चिम रेल्वेवरही मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकापर्यंत दोन्ही मार्गांवर आज मध्यरात्रीनंतर १२.३० ते पहाटे ४.३०पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नाहीत.

चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल माहीम, माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी स्थानकात थांबणार नाहीत. तसेच या लोकल लोअर परळ, माहीम, खार स्थानकात दोनवेळा थांबतील.

या मेगाब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करताना प्रवाशांची काही प्रमाणात अडचण होणार आहे.

मेगाब्लॉकच्या कालावधीत चर्चगेटहून सुटलेल्या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नसून चर्चगेटच्या दिशेकडील लोकल लोअर परळ, माहीम स्थानकात थांबणार नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number