‘कोणतीही बेशिस्ती खपवून घेणार नाही’ – अनिल परब

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संपावर बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कर्मचारी मान्य करत आजपासून पुन्हा कामावर रुजू होतील असा विश्वास सरकारने व्यक्त केला. मात्र सरकारचा निर्णय अमान्य करत कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. […]

‘कोणतीही बेशिस्ती खपवून घेणार नाही’ – अनिल परब

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संपावर बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कर्मचारी मान्य करत आजपासून पुन्हा कामावर रुजू होतील असा विश्वास सरकारने व्यक्त केला. मात्र सरकारचा निर्णय अमान्य करत कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांना इशारा दिला.

वेतनवाढ करूनही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकित पगारवाढीच्या इतर निर्णयावर फेरविचार करणार असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही तर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

राज्य सरकारने वेतनवाढ केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. मात्र आंदोलन मागे घेतले नाही तर आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

प्रत्येकवेळी शिष्टमंडळ बदलत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची कोणतीही बेशिस्ती खपवून घेणार नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. विलिनीकरणाचा निर्णय मार्गी लागेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करत आर्थिक दिलासा दिला आहे. त्यामुळे केवळ एका मुद्द्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप ताणू नये असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number