‘मुश्रीफांवर २ आठवडे कारवाई नको’

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्याही सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी […]

‘मुश्रीफांवर २ आठवडे कारवाई नको’

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्याही सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.

११ जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते.

बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number