‘या’ आध्यात्मिक सॉफ्टवेअरने संस्कृतमध्ये बोलणार गोमाता, वाघ बोलणार तामिळ?

यापुढे जेव्हा तुम्ही गोमातेचा आशीर्वाद घ्यायला जाल, तेव्हा गाय हंबरण्याऐवजी चक्क तुम्हाला ‘आयुष्यमान भव!’ असा संस्कृतमध्ये आशीर्वादही देऊ शकतील… हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?  गाय, माकड यांना तुम्ही मुकी जनावरं मानता का? मात्र हेच मुके प्राणी चक्क संस्कृत आणि तामिळही बोलणार आहेत…   एकेकाळी सेक्स स्कॅण्डलमुळे गाजलेल्या स्वघोषित बाबा स्वामी नित्यानंद […]

‘या’ आध्यात्मिक सॉफ्टवेअरने संस्कृतमध्ये बोलणार गोमाता, वाघ बोलणार तामिळ?

यापुढे जेव्हा तुम्ही गोमातेचा आशीर्वाद घ्यायला जाल, तेव्हा गाय हंबरण्याऐवजी चक्क तुम्हाला ‘आयुष्यमान भव!’ असा संस्कृतमध्ये आशीर्वादही देऊ शकतील… हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?  गाय, माकड यांना तुम्ही मुकी जनावरं मानता का? मात्र हेच मुके प्राणी चक्क संस्कृत आणि तामिळही बोलणार आहेत…

 

एकेकाळी सेक्स स्कॅण्डलमुळे गाजलेल्या स्वघोषित बाबा स्वामी नित्यानंद यांनी असा दावा केलाय, की  माणसाकडे असणारं आणि या मुक्या प्राण्यामध्ये नसणारं स्वरयंत्र आध्यात्मिक प्रक्रियेने त्यांच्या शरीरात निर्माण करता येतं. असं सॉफ्टवेअरच आपण निर्माण केलं असून, लवकरच माझ्याकडे संस्कृत आणि तामिळमध्ये संभाषण करणाऱ्या गायी माझ्याकडे आढळून येतील.

 

आपल्या सॉफ्टवेअरची चाचणी करून झाली आहे. त्याच आधारावर आपण हे बोलत असल्याचा दावा नित्यानंदांनी केला आहे. गायीच नव्हे, तर वर्षभरात माकडं, वाघ, सिंहही माणसाप्रमाणे संस्कृत आणि तामिळ बोलताना लोकांना पाहायला मिळतील, असं स्वामी नित्यानंद यांनी ठामपणे म्हटलं आहे.

 

याच स्वामी नित्यानंद यांचं सेक्स स्कॅंडल 2010 साली गाजलं होतं. एका अभिनेत्रीसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील कथित सीडी एका वृत्तवाहिनीने दाखवली होती. या स्वामी नित्यानंद यांचे दक्षिण भारतात अनेक भक्त आहेत. आता बाबांच्या या बोलण्यावरही हे भक्त डोळे झाकून विश्वास ठेवतात का, हा प्रश्न आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number