वृत्तसंस्था, पाटणा
बिहारमध्ये सत्तेचे फासे पलटले आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला. त्यानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार चोवीस तासांच्या आत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-जदयू समीकरण जुळलं आहे. 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत राजकीय हालचाली सुरुच होत्या. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली.