Nitin Gadkari Road Plan: रस्त्यावर खड्डा दिसताच फोटो थेट गडकरींकडे; AI गाडी हायवेवर ठेवणार 24 तास नजर

3D लेझर स्कॅनर व कॅमेऱ्यांद्वारे रस्त्यांची तपासणी होणार असून, दोष आढळल्यास ठेकेदारांचे पेमेंट थांबवले जाईल. यामुळे पारदर्शकता आणि रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे.

Nitin Gadkari Road Plan: रस्त्यावर खड्डा दिसताच फोटो थेट गडकरींकडे; AI गाडी हायवेवर ठेवणार 24 तास नजर

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या (National Highways) देखभालीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवा AI रोड मेंटेनन्स प्लॅन (AI Road Maintenance Plan) जाहीर केला आहे. या नव्या योजनेमुळे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मानवी अहवालांवर असलेले परावलंबन कमी होणार असून थेट तंत्रज्ञानाच्या आधारे निगराणी केली जाणार आहे.

गडकरी यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, सध्या एक विशेष हायटेक वाहन विकसित केले जात आहे. या वाहनामध्ये 3D लेझर स्कॅनर (3D Laser Scanner), हाय-रेझोल्यूशन कॅमेरे (High-Resolution Cameras) आणि GPS प्रणाली (GPS System) बसवण्यात येणार आहे. हे वाहन महामार्गांवरील प्रत्येक मीटर रस्त्याची तपासणी करून फोटो आणि व्हिडिओ थेट सरकारी सर्व्हरवर अपलोड करणार आहे.

या AI प्रणालीमुळे रस्त्यावरील खड्डे, भेगा, पृष्ठभागाची खोली आणि इतर तांत्रिक दोष अचूकपणे ओळखता येणार आहेत. मिळालेला डेटा थेट ठेकेदारांच्या कामगिरीशी (Contractor Performance) आणि त्यांच्या पेमेंटशी जोडला जाणार आहे. जर रस्ता खराब आढळला, तर संबंधित ठेकेदाराचे पेमेंट आपोआप थांबवले जाणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला रामराम! प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाल्या, 'देवाभाऊंच्या साथीने…'

या नव्या व्यवस्थेमुळे रस्ते देखभालीतील हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचा सरकारचा दावा आहे. आतापर्यंत अनेक वेळा रस्त्यांच्या खराब स्थितीबाबत तक्रारी करूनही अहवालांमध्ये ‘सर्व काही ठीक आहे’ असे दाखवले जात होते. मात्र आता Human Intervention जवळपास संपवून तंत्रज्ञानावर आधारित निर्णय घेतले जाणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 (NH-8) सारख्या रस्त्यांच्या खराब अवस्थेचा मुद्दा संसदेत उपस्थित झाल्यानंतर गडकरी यांनी प्रामाणिकपणे अडचणी मान्य केल्या. काही रस्त्यांचा डिफेक्ट लायबिलिटी कालावधी (Defect Liability Period) संपल्यानंतर देखभालीत त्रुटी राहिल्याचे त्यांनी कबूल केले आणि त्यावर उपाय म्हणून ही नवी पॉलिसी आणत असल्याचे सांगितले.

गडकरी यांच्या मते, ही AI आधारित रोड पॉलिसी (AI Based Road Policy) पुढील एका महिन्यात प्रत्यक्ष अंमलात आणली जाईल. या धोरणामुळे देशातील महामार्ग अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि दर्जेदार बनतील, तसेच नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षाखेरीस दोन मेट्रो मार्गिका होणार सुरू, कोणता मार्ग असणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number