जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यभरात फेरीवाल्यांविरोधात मनसेचे फेरीवाला हटाव आदोलन सुरु असतांनाच मालाडमधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे मनसे आता प्रचंड आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलंय.
नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसेला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल’. असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेयेत.